रविवार आणि ती – १

मी पहिल्यांदा तिला पाहिले ते मे महिन्यातल्या रविवारच्या एका ढगाळलेल्या सकाळी.

आठवणींना जाग यायला फारसं काही लागत नाही… कधीतरी उगीच कुठलासा अगरबत्तीचा वास काही लहानपणीच्या आरत्यांच्या आठवणी जागवतो किंवा कधी एखादी पावसाळी संध्याकाळ कधीकाळीच्या भजी- कटिंगवाल्या डेटची आठवण करून देते किंवा एखाद्या मऊ गोधडीचा स्पर्श आजीच्या कुशीत शिरुन ऐकलेल्या गोष्टींचा पेटारा उघडतो…

तिची आठवण यायला थोडे ढगच पुरेसे असतात. ती होतीही तशीच. ढगांमधुन झळकणऱ्या किरणांसारखी… लख्खकन चमकणाऱ्या बिजलीसारखी. ती मला काही वर्षांपुर्वी colony मधल्या बागेत फेऱ्या मारताना दिसली. मे महिना सरायला आला होता. सकाळचे सात वाजले होते पण हवेत प्रचंड दमटपणा असल्याने सगळेच मरगळलेले दिसत होते. ती मात्र धपाधप फेऱ्या मारत होती. हे नवीनच व्यायाम चालू केल्याचं लक्षण होतं. ’उद्या बघू किती उत्साह आहे ते’ असा विचार करुन मी स्वत:शीच हसलो आणि माझ्या ४-५ फेऱ्या संपवून नेहेमीप्रमाणे प्राणायाम-कपालभाती करायला लागलो.

दुसऱ्या दिवशी ती पुन्हा दिसली. त्याच जोमानं फेऱ्या मारताना. मला कौतुक वाटलं तिचं. ती तशी बारीकही नव्हती आणि जाडही. मध्यम बांध्याची मध्यम उंचीची, सावळी, केस अगदी मुलांसारखे कापलेले आणि लालसर रंगवलेले, नाकी डोळी रेखीव तरी डोळे जरा मोठेच वाटावे अशी ती समोरून येणाऱ्या प्रत्येकाला हसून अभिवादन करत होती. तिचं हास्य अगदी निरागस होतं आणि तिच्या डोळ्यांप्रमाणेच मोठं होतं. साधारण वीस -पंचवीसच्या दरम्यान वय असावं तिचं. त्यानंतर ती नियमीत दिसायची, पाहुन हसायची.

एक दिवस मी बाकावर बसून कपालभाती करत असताना ती अचानक आली माझ्या दिशेने आणि हुश्श करुन बसली बाजूला. मी नजरेनेच तिला अभिवादन केलं. ती दोन मिनिटं अस्वस्थशी बसून म्हणाली, “Can I have some water, please?”. मी न थांबता तिला इशारा केला बाटलीकडे. ती “thank you!” बोलून घटाघट पाणी प्यायली. माझ्यासाठी अगदीच आचमनापुरतं ठेवुन, बाटली बाजुला ठेवुन ती आता आरामात टेकून बसली. ती जणु वाटच बघत होती माझं संपायची. मला कळेना ही माझ्याशी बोलायला थांबली आहे की सहज बसली आहे ते.

माझं आटपलंय हे जाणवताच ती हात पुढे करत म्हणाली “I am Trisha”.

मी ह्स्तांदोलन करत म्हणालो “I am Keshav. Keshav Chitnis.”

“Oh, Pardon me! Our generation is somehow not used to tell the full name. I am Trisha Roy पण मला मराठी छान येते”.

“कसं ते? पुण्याची आहेस?”

“हो!!! तुम्ही कसं guess केलं? Actually I am half Marathi half Bengali. Mom Marathi. आणि त्यात पुण्यात वाढले. काही महिनेच झाले Bombay ला shift होऊन.”

“म्हणजे मातृभाषा मराठीच की. असो. पहिले मुंबई बोलायला शिक”

“हा हा! हो! प्रयत्न चालू आहेत. Actually, मी तुम्हाला हे सांगायला आले की मी तुम्हाला ओळखते. तुम्ही आमच्या कॉलेजला आला होता लेक्चर द्यायला –“How to self-motivate without getting stressed” आणि मी ते ऐकले पण होते. मला खूपच आवडले होते, मी अजुनही तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी पाळते. It has helped me a lot! पण इतक्या वर्षांनी तुम्ही दिसलात आणि तुमचा चेहरा अंधुक आठवत होता म्हणुन…”

“अरे वा! छान शक्कल लढवलीस की ओळख पटवायची! पण त्यासाठी बाटली रिकामी करायची?” मी मिस्कीलपणे हसत तिला विचारलं आणि ती एकदम ओशाळली.

“तहान खरंच लागली होती” ती अगदी निरागसपणे म्हणाली.

“हो गं! मस्ती केली तुझी. काय तू पण! असो. निघायला हवं मला. निवृत्त असलो तरी कामं काही सुटत नाहीत.”

“Sure! It was a pleasure to meet you, Sir”

“Same here, बेटा. Sir नको, काका म्ह्ण. आता आपण दोघंही कॉलेजात नाही”

ती छान हसली आणि आली तशीच झपाझप पावलं टाकत निघुन गेली.

माझ्या समुपदेशनाच्या व्यवसायामुळे मला एक वाईट खोड लागली आहे, मी समोरच्या व्यक्तीचं माझ्या आणि तिच्याही नकळत विश्लेषण करु लागतो. तिच्या लहान सहान हालचाली, शारीरिक भाषा, प्रतिक्रीया सगळं मी माझ्या नकळत टिपतो. त्रिशाशी बोललो तेव्हाही मी तेच केलं. खरं तर मी तिला पाहिले तेव्हापसुनच तिचं निरीक्षण चालू होतं पण बोलल्यावर मात्र माझी खात्री झाली की काहीतरी बिनसलं आहे ह्या पोरीचं. तिचं स्वत:च्याच नखांशी खेळणं, सतत हलणं मला खटकलं. पण एक गोष्ट जी मला तिला दुरुन पाहुन जाणवली नव्हती ती जवळ बसून कळली ती म्हणजे तिच्या हसऱ्या डोळ्यात झाकणारे कारुण्य.

Advertisements

2 Comments Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s